ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 15, 2020 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दादर रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्रेते-फेरीवाल्यांकडून हप्तावसुली

शहर : मुंबई

दादर रेल्वे स्थानकाच्या परिसरातील भाजी विक्रेते आणि फेरीवाल्यांकडून सर्रास हप्तावसुली सुरु असल्याप्रकरणी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे ) आक्रमक झाली आहे. हप्तावसुली करणाऱ्या सूत्रधारांना तात्काळ गजाआड करा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली. तसेच याप्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोपही देशपांडे यांनी केलाय.

काही दिवसांपूर्वीच या घटनेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी हप्तावसुली करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले होते. परंतु, तीन ते चार दिवसांतच हा व्यक्ती जामिनावर बाहेर पडला.

आमचा मुद्दा हा आहे की, अटक केलेल्या व्यक्तीकडून पोलिसांना काय माहिती मिळाली? तो हप्ते कोणासाठी गोळा करत होता ? काहीतरी सेटिंग असल्याशिवाय फेरीवाले कुणाला हफ्ता देणार नाहीत. महापालिका किंवा पोलिसांशी सेटिंग असल्याशिवाय हे घडणार नाही. हप्ता गोळा केलेला हिस्सा तो कुणाकुणाला द्यायचा हे बाहेर आले पाहिजे. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. जे कुणी भ्रष्ट अधिकारी गजाआड जाणे गरजेचे आहे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

त्यासाठी मी सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. ते याप्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. भविष्यात असे प्रकार निदर्शनास आल्यास त्याचे पुरावे मनसेकडे पाठवावेत. आम्ही त्याचा पाठपुरावा करु, असेही देशपांडे यांनी सांगितले.

मागे

लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रोमध्ये मोठे बदल, मेट्रो प्रवासासाठी 'हे' असणार नियम
लॉकडाऊननंतर मुंबई मेट्रोमध्ये मोठे बदल, मेट्रो प्रवासासाठी 'हे' असणार नियम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेलं लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात येत ....

अधिक वाचा

पुढे  

ट्विटर झाले डाऊन, अनेक युजर्सला फटका
ट्विटर झाले डाऊन, अनेक युजर्सला फटका

समाज माध्यमांपैकी एक ट्विटर. ट्विटर चक्क डाऊन झाल्याने याचा फटका अनेक युजर....

Read more