By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 03:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘आयुष्यमान भारत’ योजनेत दोन लाखांपेक्षा अधिक बनावट कार्ड बनविल्याची बाब उघड झाली आहे. एका वर्तमानपत्राने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये सुरू झालेल्या आयुष्यमान भारत योजनेतंर्गत गरिब रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. आतापर्यंत 70 लाख लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्याचा खर्च सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, या योजनेत गैरप्रकार झाल्याचे उघड झाले आहे.
उत्तर प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड आणि झारखंडमधून अधिक बनावट कार्ड बनविण्यात आले आहेत. गुजरातमध्ये एकाच कुटुंबात तब्बल 1700 आयुष्यमान भारत कार्ड आढळून आले आहेत. तर छत्तीसगडमध्ये एका कुटुंबातील 57 जणांना या योजनेतून डोळय़ांची सर्जरी केल्याचे उघड झाले. पंजाबमध्ये दोन कुटुबांच्या नावावर 200 कार्ड बनविण्यात आले आहेत. तर मध्यप्रदेशात एका कुटुबांच्या नावावर 322 बनावट कार्ड छापण्यात आले आहेत. याप्रकरणी राजकोटमध्ये 6 जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई - सोन्या-चांदीच्या दरांत शुक्रवारी विक्रमी वाढ झाली आहे. गे....
अधिक वाचा