ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 01, 2020 10:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

शहर : वर्धा

समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा स्वॅब घेणे आणि शवचिच्छेदन करण्यावरुन बराच काळ गदारोळ झाला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आणि मृतदेहाचे समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्याचे स्वॅब घेण्यात आले.यातही कोरोनाच्या संशयाने कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले.

जाम येथील 47 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला दहा दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप असल्याने तो घरीच होता. हा व्यक्ती चालक असल्याने त्याचे अनेक ठिकाणी जाणे येणे सुरु होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची लक्षणं कोरोनाची असल्याने त्याची कोरोना चाचणी करुन अहवाल येईपर्यंत त्याचा मृतदेह शीतपेटीत ठेवायचा होता.

जामचे सरपंच सचिन गावडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली. मात्र, पीपीई किट नसल्याने त्याला रुग्णवाहिकेत टाकायचे कुणी हा प्रश्न निर्माण झाला होता. आरोग्य विभागाचा कोणी कर्मचारी मृतदेहाला हात लावत नसल्याने गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती

मृतदेह समुद्रपुरात न्यावा की हिंगणघाटला यावरुन दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांचे एकमत नसल्याने नागरिकांची फरफट झाली.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सूचनेवरुन समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून त्याचा स्वॅब घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर व्यक्ती कोरोना संशयित असल्याने मृताच्या नातलगांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी निर्णय घेत प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

       

 

मागे

सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका
सर्व राज्यांमध्ये दारुविक्री बंद करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका

सुप्रीम कोर्टात सगळ्या राज्यांमध्ये दारुविक्री थांबवावी म्हणून एक याचिका....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश
पुण्यात प्रतिबंधित क्षेत्रात नवे भाडेकरु आणि कामगारांना बंदी, प्रशासनाचे नवे आदेश

कोरोना संसर्गाच्या वाढत्या आकडेवारीचा विचार करुन पुणे प्रशासनाने पुण्यात....

Read more