By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 05, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सुट्ट्यांच्या काळात खासगी बसने गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या इतर आरक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे खासगी बस चालकांनी बस तिकिटात पंचवीस ते तीस टक्के वाढ केली आहे. मुंबईत पार पडलेल्या मतदानानंतर आणि शाळांना लागलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबईतले चाकरमानी गावाकडे निघालेत. एस. टी. रेल्वे आरक्षण सध्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे खासगी बसने आपल्या गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांना चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागत आहे. संधीचा फायदा घेत खासगी बस चालकांनी तिकीट दरात भरमसाट वाढ केली आहे.
सुट्ट्या आणि सणांच्या काळात खासगी बस कंपन्या तिकिटात वाढ करतात. कारण इतर वेळी व्यवसाय फारसा नसतो. शिवाय वाढलेले इंधन दर यामुळे नाइलाजास्तव एस टी बसच्या तुलनेत काही प्रमाणात वाढ करावी लागत असल्याचे खासगी बस कंपन्यांचे म्हणणे आहे. याबाबत टॅव्हल्स व्यावसायिक गणेश पेडणेकर यांनी माहिती दिली. या बस भाडेवाढीचे समर्थन केले.
अशी करण्यात आलेय भाडेवाढ
मुंबईसह महाराष्ट्रभरच खासगी बस चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडं आकारले जात आहे. हंगामी काळात थोडी झालेली वाढ प्रवासी सहन करू शकतात. मात्र या सगळ्या खाली प्रवाश्यांची सुरू असलेली लूट थांबणं गरजेचं आहे. त्यासाठी परिवहन विभागाने योग्य ती पावलं उचलन गरजेच आहे.
विकासकांच्या फायद्यासाठी एसटी थांबा विकला गेल्याचा फलक घाटकोपर पश्चिम ये....
अधिक वाचा