ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

By GARJA ADMIN | प्रकाशित: मार्च 30, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

शहर : यवतमाळ

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून यवतमाळमधील शेतकऱ्यानं आत्महत्या केली. शेतकऱ्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकारचा उल्लेख आहे. शेतकऱ्यानं त्याच्या आत्महत्येसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. शेतकऱ्यानं लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली.

यवतमाळच्या पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केली. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार धरलं आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचं 2 लाखांचं कर्ज होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

गेल्या काही वर्षांमध्ये नापिकीमुळे धनराज यांचं शेतीत मोठं नुकसान झालं, अशी माहिती त्यांच्या कुटुंबानं दिली. नव्हाते बुधवारी सकाळी त्यांच्या विवाहित मुलीला भेटण्यासाठी घराबाहेर पडले. त्यांची मुलगी वणीला वास्तव्यास आहे. मात्र ते दुसऱ्या दिवशी घरी परतले नाहीत. यानंतर कुटुंबानं त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांचा मृतदेह त्यांच्याच शेतातील खड्ड्यात सापडला. त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं आहे.

मागे

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त
सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त

सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा....

अधिक वाचा

पुढे  

काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न सीआरपीएफच्या ताफ्याजवळ कारचा स्फोट
काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न सीआरपीएफच्या ताफ्याजवळ कारचा स्फोट

जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू महामार्गावर कारमध्ये झालेला स्फोट हा सि....

Read more