ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा राजभवनावर 'प्रहार', पोलिसांनी घेतलं ताब्यात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 14, 2019 01:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा राजभवनावर 'प्रहार', पोलिसांनी घेतलं ताब्यात

शहर : मुंबई

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आज राजभवनावर मोर्चा काढणार होते. मात्र त्याआधीच मरीन ड्राईव्ह पोलिसांनी कारवाई करत बच्चू कडू यांना ताब्यात घेतलं.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा अभूतपूर्व गोंधळ सुरू आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना राजकारणी मात्र सत्तास्थापनेच्या खेळात व्यस्त आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा, अशी मागणी करत बच्चू कडू यांनी राजभवनाच्या दिशेन मोर्चा काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बच्चू कडूंना ताब्यात घेतल्यानंतर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी विधानसभेबाहेर घोषणाबाजी केली. तसंच नुकसान झालेली पिकं आणि फळ रस्त्यावर फेकली आहेत. त्यामुळे राजभवन परिसरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

'राष्ट्रपती नको, लष्कर आणा'

'माझं आंदोलन शेतकऱ्यांसाठी आहे. यावेळी पावसाने शेतकरी कोलमडून गेला आहे. त्याला अपेक्षा आहे की सरकारने काही करावं. राज्यात राष्ट्रपती राजवट आहे म्हणून आम्ही राज्यपालंना भेटतो. पण आता राष्ट्रपती नको लष्कर आणा, निदान जय जवान जय किसन तरी होईल,' अशी संतप्त प्रतिक्रिया पोलीस कारवाईनंतर बच्चू कडू यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षामुळं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-सेनेत बिनसल्यानंतर राज्यात अभुतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. तर दुसरीकडे भाजपपासून फारकत घेतलेल्या शिवसेनेनं काँग्रेस-राषट्रवादीच्या मदतीनं सत्तास्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे. सत्तेचं सोपान गाठण्यासाठी विरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येण्याच्या दिशेनं आता वाटचाल सुरू केली आहे.

 

मागे

Children's Day: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?
Children's Day: 14 नोव्हेंबरला बालदिन का साजरा करतात?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बाल....

अधिक वाचा

पुढे  

नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू
नाशिकची गायिका गीता माळीचा अपघातात मृत्यू

नाशिकची प्रसिद्ध गायिका गीता माळीचा आज अपघात झाला. या भीषण अपघातात गीता माळ....

Read more