ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2020 06:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक

शहर : देश

गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. नऊ दिवस झाले तरी सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे.

गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. पण सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये. सरकार आम्हाला कमी लेखत आहे, असा संताप व्यक्त करतानाच सरकारच्या या हेकेखोरपणाचा निषेध म्हणून येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात येत असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

कृषी कायदा रद्द केल्याशिवाय राहणार नाही

कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला. सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते 8 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.

शेतकरी आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका

गेल्या नऊ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून त्याविरोधात ऋषभ शर्मा नावाच्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नवी दिल्ली आणि नोएडा परिसरात कोरोनाचा धोका असल्याने शेतकऱ्यांना आंदोलन संपवायला सांगा, अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकेत काय म्हटलंय

शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाल्याने कोरोनाच्या कम्युनिटी स्प्रेडचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ हटविण्यात यावे.

आंदोलक शेतकऱ्यांनी रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे एमर्जन्सी/ मेडिकल सर्व्हिसला अडचणी निर्माण होत आहेत.

दिल्लीतील मोठ्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी लोक दिल्लीत येतात. या आंदोलनामुळे त्यांना रुग्णालयात जाण्यास अडचणी येत आहेत.

26 नोव्हेबरला दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना बुराडी निरंकारी मैदानावर शांततेत आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. मात्र, शेतकऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे.

उद्याच्या बैठकीकडे लक्ष

उद्या 5 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधी दरम्यान बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दिल्ली-गाजीपूर बॉर्डरवर तिन्ही कृषी विधेयकांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी उद्या शनिवारी अंतिम फैसला झाला नाही तर दिल्लीतील रस्ते बंद करण्यात येईल. तसेच दिल्लीतील भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विक्रीची दुकानेही बंद करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

मागे

Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक
Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक

शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी ....

अधिक वाचा

पुढे  

राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी 9 डिसेंबरला सुनावणी
राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश, मराठा आरक्षणावरील स्थगिती मागे घेण्यासाठी 9 डिसेंबरला सुनावणी

मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणाच्या अंमल....

Read more