ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा पेच सर्वोच्च न्यायालयात; आज पुन्हा सुनावणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 17, 2020 11:02 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Farmers Protest | शेतकरी आंदोलनाचा पेच सर्वोच्च न्यायालयात; आज पुन्हा सुनावणी

शहर : देश

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन गेल्या 22 दिवसांपासून सुरु आहे. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या वेशीवरुन हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काल (बुधवारी) याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. आज पुन्हा शेतकरी आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. ही सुनावणी आज दुपारी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पार पडलेल्या सुनावणीमध्ये बोलताना सांगितलं की, शेतकरी आंदोलनासंदर्भात कोणताही आदेश देण्यापूर्वी ते आंदोलकांची भूमिकाही जाणून घेणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काल पार पडलेल्या सुनावणीमध्ये आठही शेतकरी संघटनांची बाजू विचारात घेण्याचं ठरवलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने काल सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी झाली की हा प्रश्न सोडवण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. यात आंदोलक संघटनांसोबत सरकारमधील आणि देशातील इतर भागातील शेतकरी संघटना आणि असे काही लोक असतील, जे या चळवळीत सामील होणार नाहीत. न्यायालयाने या प्रकरणात सहभागी पक्षांना समितीच्या सदस्यांना सूचना देण्यास सांगितले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी 8 संघटनांची एक समिती गठीत करण्यास सांगितलं आहे. यामध्ये भारतीय किसान यूनियन (टिकेत), बीकेयू सिधुपूर, बीकेयू राजेवाल, बीकेयू लाखोवाल, जम्हूरी किसान सभा, बीकेयू दकोंडा, बीकेयू दोआबा, कुल हिंद किसान फेडरेशन यांचा समावेश आहे. या समितीमध्ये आंदोलकांच्या संघटनेसोबत सरकार आणि देशातील इतर शेतकरी संघटनांचे लोकही सहभागी होणार आहेत.

दुसरीकडे शेतकरी संघटनांनी बुधवारी संध्याकाळी सिंघू बॉर्डरवर पत्रकार परिषद घेत सांगितलं की, डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. जे गुरुवारी सुरु होणार आहे. ज्या दिवसापासून आंदोलन सुरु झालं तेव्हा शेतकरी आंदोलनाचं कोणतंही डिजिटल प्लॅटफॉर्म नव्हता. त्यामुळे आज शेतकरी डिजिटल प्लॅटफॉर्म सुरु करणार आहेत.

शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की, आमचं आंदोलन शांततेत सुरु आहे. आम्ही एका आठवड्यात एक कोटी लोकांशी डिजिटल प्लॅटफॉर्ममार्फत जोडले जाणार आहोत. ट्विटर, फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्राम, युट्युबवरही आम्ही शेतकरी आंदोलनाचे डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहोत. लाईव्ह कव्हरेजही या पेजवर देण्यात येणार आहे. जेणेकरुन सरकारला हे माहिती होईल की, आंदोलन केवळ सिंघू, टिकरी बॉर्डरवरच नाहीतर संपूर्ण देशभरात सुरु आहे. जो कोणी या आंदोलनाच्या विरोधात भूमीका घेईल, त्यांना आमच्याकडून उत्तर नक्की मिळेल.

मागे

शेतकरी आंदोलन पेटलं! दिल्लीत संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या
शेतकरी आंदोलन पेटलं! दिल्लीत संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

दिल्ली-हरियाणा सीमेवर (सिंघू बॉर्डर) आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंग (Sant Baba Ram....

अधिक वाचा

पुढे  

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह होते तरी कोण?
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आत्महत्या करणारे संत बाबा राम सिंह होते तरी कोण?

देशभरात शेतकरी आंदोलनं अधिक गंभीर वळण घेत असून यादरम्यानच एका घटनेनं पुन्ह....

Read more