ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 28, 2021 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्ली हिंसेमागे भाजप नेत्याचाही हात, चौकशी करा; सुब्रमण्यम स्वामींचा घरचा आहेर

शहर : देश

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसेवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला आहे. स्वामींनी ट्विट करून लाल किल्ल्यावर झालेल्या गडबडीमागे पीएमओच्या जवळच्या भाजप नेत्याचा हात असल्याचा संशय सोशल मीडियातील वृत्ताच्या आधारे व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे.

सुब्रमण्यम स्वामी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. सध्या एक चर्चा सुरू आहे. कदाचित ती खोटी असू शकते किंवा शत्रूंच्या आयडीवरूनही ही चर्चा सुरू असू शकते. पीएमओच्या जवळ असलेल्या एका भाजपच्या सदस्याने लाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे याचा तपास करून खुलासा व्हावा, असं स्वामींनी म्हटलं आहे.

ट्विट रिट्विट करून भाजपची डोकेदुखी वाढवली

स्वामी एवढ्यावरच थांबलेले नाही तर त्यांनी अभिनेता दीप सिद्धू यांच्याशी संबंधित एक ट्विट रिट्वीट केलं आहे. लाल किल्ला परिसरात उसळलेल्या हिंसेतील आरोपी दीप सिद्धू हा भाजपचे खासदार सनी देओल यांच्या प्रचार कँम्पेनर होता, असं या ट्विट मध्ये लिहिलं होतं. स्वामींनी हे ट्विट रिट्विट करून भाजपची गोची केली आहे.

मोदी-शहांची प्रतिमा मलिन

स्वामींनी आणखी एक ट्विट करून काही प्रश्न उपस्थित करतानाच भाजपला कानपिचक्या दिल्या आहेत. या घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रतिमा मलिन झाली आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांची प्रतिष्ठाही धुळीस मिळवली आहे, असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारवरही टीका केली आहे. दिल्लीतील हिंसेवरून तर्क-वितर्क सुरू असतानाच स्वामींनी ट्विटरवरून आपल्याच पक्षाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याने भाजप समोरच्या अडचणीत वाढ झाली आहे.

काय घडलं होतं रॅलीत?

मंगळवार 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. ही दगडफेक सुरू होताच पोलिसांनीही शेतकऱ्यांवर लाठीचार्ज सुरू केला. त्यामुळे शेतकरी अधिकच आक्रमक झाले. शेतकऱ्यांनी पोलिसांच्या बॅरिकेट्स तोडल्या. शेतकऱ्यांनी काही वाहनांची तोडफोडही केली. परिणामी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करावा लागला.

 

मागे

फ्रान्सवरुन नॉनस्टॉप 7000 किमीचा प्रवास; हवेतच भरलं इंधन, आणखी 3 राफेल विमानं भारतात दाखल
फ्रान्सवरुन नॉनस्टॉप 7000 किमीचा प्रवास; हवेतच भरलं इंधन, आणखी 3 राफेल विमानं भारतात दाखल

प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय वायूदलाच्या सामर्थ्यात आणखी भ....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय
Mumbai Local | 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु, ठाकरे सरकारचा निर्णय

कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं झोनमधील लॉकडाऊन वाढवण्य....

Read more