By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 19, 2024 12:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
FASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
देशभरात मागील दशभराच्या काळाचा आढावा घ्यायचा झाल्यास नव्या रस्त्यांनी देशातील बहुतांश राज्यांना जोडण्यात आल्याचं पाहायला मिळालं आहे. वाहतुकीमध्ये सुसूत्रता आणत प्रवास आणखी सुकर करण्यासाठी म्हणून केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयानं काही महत्त्वपूर्ण पावलं उचलत या प्रक्रियेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचीसुद्धा जोड घेतली. त्यातच भर पडली होती ती म्हणजे फास्टॅगची.
देशभरात महामार्गांनी कुठंही प्रवास करायचा झाल्यास तिथं टोल आकारला जातो आणि याच टोलनाक्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी केंद्रानं फास्टॅगच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळं या बदलांकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही. इथून पुढं तुमच्या वाहनावर फक्त फास्टॅग असून चालणार नाही, तर तो ठराविक जागेतच असणं अपेक्षित आहे. NHAI च्या वतीनं हा नियम जारी करण्यात आला आहे.
काय सांगतो नवा नियम?
वाहनाच्या काचेवरील फास्टॅगबाबत केंद्रीय यंत्रणांकडून एक नवा नियम जारी करण्यात आला आहे. ज्यानुसार वाहनाच्या पुढील काचेवर फास्टॅग अनिवार्य असणार आहे. वाहनाच्या पुढील काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारला जाणार आहे. अनेक चालक फास्टॅग खिशात, पाकिटात किंवा इतरत्र ठेवतात. त्यामुळे टोल नाक्यावर स्कॅनिंग करायला वेळ लागतो, त्याचा फटका इतर वाहनचालक आणि प्रवाशांना बसतो. हा वेळ वाचवण्यासाठी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी म्हणून हा नवा नियम लागू करण्यात आला आहे.
वाहनांवर असणार करडी नजर...
NHAI नं फास्टॅगसंदर्भातील हे नवे निर्देश जारी करत या नव्या नियमासंदर्भातील माहिती देशातील सर्व टोलनाक्यांवर जाहीर पद्धतीनं प्रदर्शित केली जाणार असल्याचं सांगितलं. नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनधारकांना या बदलाची कल्पना देऊन सूचित करणं हा यामागचा मुख्य हेतू असेल. फास्टॅग नसणाऱ्या वाहनांकडून दुप्प रक्कम आकारली जाणार असून, त्याशिवाय टोल नाक्यांवर वाहनांचा नोंदणी क्रमांक सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेकॉर्ड केला जाणार असून, वाहनाकडून यापूर्वी कोणते नियम मोडले गेले आहेत याचा पाढाही वाचला जाणार आहे.
Ganpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची ब....
अधिक वाचा