By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 02:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : नाशिक
मुंबई - नाशिक महामार्गावर एका कंटेनरने पादचर्यांना चिरडले असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहापूर तालुक्यातील आटगाव जवळ हा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून यात एका महिलेचा समावेश आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावरुन चालणार्या पादचार्यांच्या अंगावर गेला. पादचार्यांना चिरडत कंटेनर तसाच पुढे गेला आणि रेल्वे फाटकावर जाऊन आदळला. अंगावरुन कंटेनर गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला.
लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात सुरवात झाली असून मात्र ....
अधिक वाचा