By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 11:49 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुणे – अगदी कमी वेळातच चहाप्रेमींमध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’मध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. केंद्र सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालात या चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले असून यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने चांगलाच का दणका दिला आहे.
यापूर्वीही येवले चहावर अन्न आणि प्रशासनाने येवले चहाच्या मालाचे काही नमुने जप्त केले होते. त्यामध्ये पहिल्या अहवालाचा निकाल चांगला आला होता मात्र दुस-या अहवालात सिंथेटिक फूड कलर आढळून आला आहे. फूड कलरमुळे चहाला रंग येत असल्याचं केंद्रीय प्रयोग शाळेने अहवालात सिद्ध केले आहे. यापूर्वीही विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले होते. पण चहामध्ये भेसळ आढल्यामुळे आता यावर कारवाई करण्यात येणार आहे.
दिशाभूल करणारी जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दलही ‘येवले चहा’ला नोटीस बजावली हेती. या प्रकरणी ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार करण्यात आली होती. चहा तयार करण्यासाठी मिनरल वॉटर वापरलं जात असून चहामुळे पित्त होत असल्याची जाहिरात केली जात होती.
दरम्यान, पुण्यातून ‘येवले अमृततुल्य चहा’च्या शाखांना सुरुवात झाली. अल्पावधीतच पुणेकर चहाप्रेमींच्या मनात ‘येवले अमृततुल्य चहा’ने स्थान मिळवलं. पुणेकरांनी गौरवलेला चहा राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचला. कोणत्याही वेळी चहाची तल्लफ भागवणारे ‘अमृतपेय’ पिण्यासाठी ‘चहा’त्यांची गर्दी उसळते. पण आता मात्र यामुळे चहाप्रेमी काहीसे खट्टू झाले आहेत.
तिरुअनंतपुरम- नेपाळच्या एका हॉटलमध्ये आज ८ भारतीय पर्यटकांचे मृत....
अधिक वाचा