By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 01:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
सातारा - सातार्यातील एमआयडीसीमध्ये दोन कंपन्यांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत जुन्या कंपन्या जळून-खाक झाली आहेत. ही आग सकाळच्या सुमारास तीन वाजल्याच्या दरम्यान शॉर्ट सर्किटनेमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.
कंपन्या लगत असलेल्या अँटिक ट्रान्सपोर्ट अँड प्रा.लि. या कंपनीत लागलेल्या आगीत २० लाखाहून जास्त नुकसान झाल्याचे अंदाज व्यक्त केला जात आहे. तेलाचे डबे, मशिनरी अशा अनेक साहित्यांचा समावेश आहे.
आगीला विझविण्यासाठी सातारा पालिकेच्या आग्निशमन दलाचे बंब, रहिमतपूर पालिका, कूपर कारखाना, आजिक्यतारा कारखाना यांचे बंब घटनास्थळी आणून आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न आग्निशमन दलाचे जवान करीत आहेत.
मुंबई - अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतात....
अधिक वाचा