By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 20, 2019 06:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महिलांचा अपमान करणार्या विवेक ओबेरॉय याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय हे भाजपला समर्थन देवून महिलाबाबत मर्यादा सोडून अपशब्द बोलत आहेत. एका पद्मश्री मिळालेल्या महिलेचा अभिनेता विवेक ओबेरॉय एक्झिट पोलच्या नावाखाली अपमान करत आहेत. कुठे झोपलाय महिला आयोग असा संतप्त सवाल नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार कारवाई का करत नाही. सरकारने त्याच्यावर कारवाई केली नाही तर जनतेमधून उद्रेक होईल. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावा अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्याचित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत विवेक ओबेरॉयाविरोधात तात्काळ गुन्हा नोंदवून अटक करा आधी मागणी केली आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आज राष्ट्रवादीने 'जनावरांचा मोर्चा' का....
अधिक वाचा