By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 20, 2019 07:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आर्थिक वर्ष २०१८ - १९ साठी आयकर परतावा (इन्कम टॅक्स रिटर्न - ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयर असाल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली (HUF) आणि ज्याच्या अकाऊंटच्या ऑडिटची गरज नाही अशा कॅटेगिरीमधले टॅक्सपेयर्स असाल तर तुमच्यासाठी रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे ३१ जुलै... याशिवाय एका ऑडिट होणाऱ्या कंपनीसाठी आणि वर्किंग पार्टनर फर्मसाठी रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटची तारीख असेसमेंट ईयरसाठी ३० सप्टेंबर आहे. (आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी असेसमेंट ईयर २०१९-२० असेल)
३१ जुलैपर्यंत रिटर्न भरलं नाही तर...
तुम्ही रिटर्न भरण्याची डेडलाईन मिस केली तर घाबरू नका... तुम्ही उशिराही रिटर्न फाईल (Belated Return) करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला फाईल भरावं लागेल. आर्थिक वर्ष २०१८ - १९ साठी बिलेटेड रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे. ही डेडलाईन मिस केली तर तुम्ही रिटर्न फाईल करू शकणार नाहीत. त्यानंतर कर विभागाकडून जेव्हापर्यंत नोटीस मिळत नाही तोपर्यंत प्रक्रिया पुढे सरकणार नाही.
किती लेट फी भरावी लागेल?
आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे ३१ जुलै २०१९
१ ऑगस्ट २०१९ पासून ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत लेट फी ५००० रुपये
१ जानेवारी २०२० पासून ३१ मार्च २०२० पर्यंत १० हजार रुपये
३१ मार्च २०२० नंतर आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी नोटीस मिळेपर्यंत तुम्ही रिटर्न फाईल करू शकणार नाहीत
जर एखाद्याचं उत्पन्न ५ लाखांहून कमी आहे तर त्यासाठी जास्तीत जास्त लेट फी कोणत्याही परिस्थितीत १००० रुपयांपेक्षा जास्त असणार नाही. जर एखाद्याचा पगार २.५ लाखांहून कमी आहे आणि त्यानं बिलेटेड रिटर्न फाईल केलं तरीही त्याला कोणताही दंड भरावा लागणार नाही.
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विधेयक विधानसभ....
अधिक वाचा