ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 04:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रेमो डिसूझाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

शहर : देश

 

         गाजियाबाद  -  रेमो डिसूझा हा नृत्य कलाकार असून तो बॉलीवुडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर सुद्धा आहे. परंतु तो आता अडचणीत आला असून, हायकोर्टाच्या आदेशानुसार गाजियाबाद पोलिसांनी त्याचे ओळखपत्र (पासपोर्ट) जप्त करण्यात आला आहे. रेमोवर ५ कोटींची फसवणूकीचा आरोप सिहणी गेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
       

         माध्यमांच्या माहितीनुसार सत्येंद्र त्यागी नावाच्या व्यक्तिने रेमो डिसूझाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. सत्येंद्र त्यागी यांचा असा आरोप आहे की, २०१३ मध्ये रेमो बरोबर ओळख झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांनी रेमोने त्याला “अमर मस्ट डाय” या चित्रपटामध्ये ५ कोटी रुपये गुंतवण्यास सांगितले. 
        
        रेमो ने सत्येंद्र त्यागीला म्हंटले की, ५ कोटी रुपये गुंतवल्यास मी तुला त्याची दुप्पट रक्कम देईन अशी हमी दाखवून त्याला फसवले आणि चित्रपट रिलीज होऊन सुद्धा मूळ रक्कमही परत केली नाही. सत्येंद्र त्यागी याने १३ डिसेंबर २०१६ मध्ये रेमो कडून आपली रोख रक्कम मागण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही.
  
         पुजारी नावाच्या व्यक्तीकडून सत्येंद्रला जीवे मारण्याची धमकी मिळत होती. जर रेमोकडून पैशाची मागणी केली तर तुला जीवंत सोडणार नाही, मी अंडरवर्ल्ड मधून आहे, असे पुजारीने सत्येंद्रला सांगितले. या उद्देशाने सत्येंद्र यांनी गाजियाबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणात गाजियाबाद पोलीस योग्य ते निर्णय घेतील.  
   
 

मागे

'आयुष्यमान भारत' योजनेत बनावट कार्ड्सचा घोटाळा उघड
'आयुष्यमान भारत' योजनेत बनावट कार्ड्सचा घोटाळा उघड

        नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘आय....

अधिक वाचा

पुढे  

व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस
व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस

         नवी दिल्ली - सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्....

Read more