ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2020 10:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी CM योगी आदित्यनाथ मुंबईत कलाकार, दिग्दर्शकांशी चर्चा करणार

शहर : मुंबई

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आज मुंबईमध्ये काही अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मात्यांची भेट घेणार आहेत. यात अभिनेता अक्षयकुमारचीही भेट मुख्यमंत्री योगी येणार आहेत.

मुख्यमंत्री योगी स्वत: नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारलेली फिल्म सिटी मुंबईहून कोणत्याही परिस्थितीत मागे राहू नये, म्हणून योगी आदित्यनाथ मुंबईतील बड्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या संपर्कात आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे योगी आदित्यनाथ स्वत: चित्रपटसृष्टी निर्मितीवर मंथन करत आहेत आणि अधिकाऱ्यांना सूचना देत आहेत.

फिल्म सिटीमध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे हे समजून घेण्यासाठी सीएम योगी मुंबईला येत आहेत. मुंबईतील लोक उत्तर प्रदेशच्या फिल्म सिटीमध्ये काम करण्यासाठी येतील यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा सल्ला घेणार आहेत. यूपीमधील प्रस्तावित फिल्म सिटी संदर्भात मुख्यमंत्री आज बॉलिवूडमधील दिग्गजांशी बैठकीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत ते यूपीमध्ये फिल्म सिटी बनवण्याच्या योजनांविषयी फिल्मी जगातील मान्यवरांशी चर्चा करणार आहेत.

मागे

पॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या
पॅन कार्डमध्ये घर बसल्या स्वत:च करु शकता हे बदल, जाणून घ्या

पॅन आणि आधार नंबरशी (PAN-Aadhaar linking) लिंक करणं अनिवार्य आहे. कोरोना वायरसच्या प्राद....

अधिक वाचा

पुढे  

दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार, 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन
दिल्लीपाठोपाठ आता महाराष्ट्रातही शेतकऱ्यांचा एल्गार, 3 डिसेंबरला राज्यव्यापी आंदोलन

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन स....

Read more