ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 16, 2019 10:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर

शहर : मुंबई

'वायू' चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या एकंदर परिस्थितीचे परिणाम पाहता महाराष्ट्रात येणाऱ्या मान्सूनच्या वाटचालीक मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. मान्सूमपूर्व सरींनी सध्या राज्यासह अनेक ठिकाणी हवेत गारवा आला असला तरीही यंदाच्या मोसमातील मान्सून मात्र लांबणीव गेला होता. पण, अखेर ही प्रतिक्षा संपली आहे. कारण, संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहत होता तो मान्सून अखेर महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झाला आहे.

कर्नाटकच्या मंगळुरूपर्यंत मान्सून सक्रिय झाल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. येत्या एक ते दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातल्या कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. 'वायू' वादळामुळे लांबणीवर गेलेला मान्सून आता खऱ्या अर्थाने सक्रिय झाला असून तो आता महाराष्ट्रही व्यापेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

कोकणात अजून मान्सून दाखल झाला नसला तरी मान्सून पूर्व पावसाने कोकणात चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात भात पेरणी सुरू झाली आहे. भाताच्या या पेरणीला कोकणात तरवा म्हटलं जातं.. हा तरवा नंतर काढून त्या रोपांची लावणी केली जाते. सध्या कोकणात सर्वत्र अशा प्रकारे तरवा पेरला जात आहे. पावसाच्या दमदार हजेरी मुळे शेतकरी सुखावला आहे लवकरच मान्सून दाखल होईल आणि शेतीची कामंही वेगात सुरु होतील

 

मागे

चांद्रयान – 2 ची कमान सांभाळण्याऱ्या दोन महिला शास्त्रज्ञ कोण?
चांद्रयान – 2 ची कमान सांभाळण्याऱ्या दोन महिला शास्त्रज्ञ कोण?

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्रो) पुन्हा चंद्रावर आपलं यान पाठवणार असल्....

अधिक वाचा

पुढे  

डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक
डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक

कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सो....

Read more