ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 14, 2019 07:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारामन फोर्ब्सच्या यादीत 34 व्या स्थानी

शहर : देश

 नवी दिल्ली -  फोर्ब्स संस्थेने तयार केलेल्या जगातील सर्वात प्रभावशाली शंभर महिलांच्या यादीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या या यादीत 34व्या स्थानी आहेत. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल सलग नवव्या वर्षी यादीत पहिल्या स्थानी आहेत.

           युरोपीय सेंट्रल बँकेच्या अध्यक्ष ख्रिस्तीन लगार्ड दुसऱ्या स्थानी तर अमेरिकेतील लोकप्रतिनिधी नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. सीतारामन यांचा पहिल्यांदाच या यादीत समावेश झाला आहे. भारताच्या पहिल्या अर्थमंत्री असलेल्या सीतारमण यांनी देशाचे संरक्षणमंत्रीपदही भूषवले आहे.

           या वर्षाच्या पूर्वार्धात पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर केंद्रात पुन्हा एकदा भाजप प्रणित नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. सीतारामन यांच्या खांद्यावर अवघड अर्थ खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. मोदी सरकार-१ मध्ये त्यांनी संरक्षण खात्याची जबाबदारी सांभाळली होती. सीतारामन यांच्या कार्याची फोर्ब्सने दखल घेतली आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या वर्ल्ड मोस्ट पॉवरफुल वुमनच्या यादीत सीतारामन यांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. 

मागे

जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम
जागतिक मंदीचा परदेशी व्यापारावर परिणाम

जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम गेल्या महिन्यात भारताच्या परदेशी व्यापारावरह....

अधिक वाचा

पुढे  

आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास  उपलब्ध
आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास उपलब्ध

              मुंबई - नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर म्हणजेच एन....

Read more