By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 12:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोणत्याही मंदिराबाहेर गायी गुरे बांधून उदरनिर्वाह करणारे कुटुंब आपल्याला दिसतात. आता या गायी घेऊन मंदिराबाहेर बसणार्याकडून पालिकेने दंड आकारायला सुरवात केली आहे. कारण अश्या मंदिर,चौक,नाक्यावर गाय गुरे बांधतात त्यांना श्रद्धाळू चारा घालतात. त्या बदल्यात पैसे घेऊन अनेक जण आपला उदरनिर्वाह कारतात. मात्र गाईला बांधलेल्या ठिकाणी शेण मूत्र, चारा पडून ती जागा अस्वच्छ होऊन दुर्गंधी पसरते. म्हणून रस्त्यावर मंदिराबाहेर गाई गुरे बांधंनार्याकडून जास्त रकमेचा दंड आकारण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवका नेहला शाह यांनी केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दंडाच्या रकमेत वाढ केली आहे.
यापूर्वी रस्त्यावर गाय बांधल्यास अडीच हजार रुपये दंड आकारला जात होता. त्यात वाढ करून 10000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय मार्गावर काशीळ गावाजवळ गांधीनगर येथे कार चालकाचे न....
अधिक वाचा