ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

By SEJAL PURWAR | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2019 12:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पवारांसह ७० जणांवर गुन्हा दाखल

शहर : पुणे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री अमित पवार यांच्यासह ७० जणांवर सक्त वसूली संचालनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ आज बारामतीत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर पुण्यात निदर्शने करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा गुन्हा दाखल झाल्याने पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार २६ ऑगस्ट रोजी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात भारतीय दंड विभागाच्या कलम ४०९, ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४९१, १२०(ब) यांसह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या या कार्यवाहीनंतर मंगळवारी ईडीनेही गुन्हा दाखल करण्यात आला.

शरद पवार, अजित पवार, दिलीप देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव कलावडे, शिवसेनेचे आळंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे, मदन पाटील व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांसह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे.          

मागे

परतीचा पावसाचा धुमाकूळ
परतीचा पावसाचा धुमाकूळ

गेले ५-६ दिवस विश्रांति घेतलेल्या परतीच्या पावसाने काल रात्रीपासून पुन्हा ....

अधिक वाचा

पुढे  

ओएनजीसी मध्ये नाफता गळती
ओएनजीसी मध्ये नाफता गळती

ओएनजीसीच्या नवी मुंबईतील प्लांटमधून नाफता गळती झाल्याने परिसरात घबराट पस....

Read more