By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 07:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - घाटकोपरच्या असल्फा परिसरात असलेल्या बांबू गल्लीमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. असल्फ्याच्या खैराणी रोडवर ही घटना घडली आहे. या भागामध्ये अनेक लाकडाच्या वस्तू तयार करण्याचे कारखाने आहेत. अचानक या कारखान्याला भीषण आग लागली. एकापाठोपाठ एक कारखान्याला आग लागली असून या परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. याठिकाणी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम सुरु आहेत.
Huge Fire broke out at Khairani road
— Pritesh Shah (@priteshshah_) December 27, 2019
Asalpha village Ghatkoper
Mumbai pic.twitter.com/Hy1l5v0QU2
नवी दिल्ली - भारतात सणवार असल्यानंतर प्रवाशांची गैरसोय होव....
अधिक वाचा