ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गोवा एअरपोर्टवर नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळून आग

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 08, 2019 05:16 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गोवा एअरपोर्टवर नौसेनेच्या 'मिग २९' विमानातून ड्रॉप टँक कोसळून आग

शहर : panaji

विमानतळावरून उड्डाण भरल्यानंतर नौसेनेच्या मिग २९ विमानाचा 'ड्रॉप टँक' अचानक जमिनीवर कोसळून आग लागल्याची बातमी समोर आलेली आहे.  विमानाच्या बाहेरील बाजुवर लावण्यात आलेल्या फ्युएल टँकला ड्रॉप टँक म्हटलं जातं. यामध्ये अतिरिक्त इंधन भरून ठेवलं जातं. 'ड्रॉप टँक' कोसळल्यामुळे विमानतळावर आग लागली. सुदैवानं या घटनेत कुणीही जखमी झालेली नाहीत.

परंतु, या अपघाताचा थेट परिणाम गोवा विमानतळावर येणाऱ्या आणि उड्डाण करणाऱ्या विमान वाहतुकीवर झालाय. सध्या सर्व विमानांची उड्डाणं आणि लँन्डिंग थांबवण्यात आलंय. 

नौसेनेचं मिग २९ हे विमान सुरक्षित असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.नौसेनेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर वाहतुकीवर परिणाम झालाय. परंतु, लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीतपणे सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मागे

शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’
शासकीय कार्यालयात आता अर्ध्या तासांचा ‘लंचटाइम’

महाराष्ट्राची राजधानी मुंबई तसेच मुंबईबाहेरच्या शासकीय कार्यालयांमधील ल....

अधिक वाचा

पुढे  

फरीदाबाद खासगी शाळेत आगीत  तिघांचा मृत्यू
फरीदाबाद खासगी शाळेत आगीत तिघांचा मृत्यू

फरीदाबादमधील डबुआ कॉलनीमध्ये असणाऱ्या या खासगी शाळेला शनिवारी सकाळी सात व....

Read more