By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई - नागपाडा येथील चायना बिल्डिंगला आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत पाच जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन वर्षीय चिमुकलीचा समावेश असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपाडा येथील बगदादी कपांउंडमध्ये असलेल्या चायना बिल्डिंगमध्ये सकाळी आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, कामाठीपुरातील अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी दाखल होण्यास त्रास झाला. या आगीत आदिल कुरेशी (वय २०), निशा देवी (वय ३२), चंदादेवी (वय ६०), अनिया (वय २), मोहनराम (वय ७०) जखमी झाले आहेत. त्यापैकी मोहनराम यांची प्रकृती गंभीर आहे.
‘स्वच्छ भारत अभियान’ 'एक कदम स्वच्छता की ओर’ हे वाक्य आपण ने....
अधिक वाचा