ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 10, 2021 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सातारा बस डेपोत शिवशाही बसेसला आग, आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

शहर : सातारा

साताऱ्यात एसटी स्टॅंड परिसरात उभ्या असलेल्या सहा शिवशाही बसला भीषण आग लागली. या आगीत चार शिवशाही बस जळून खाक झाल्या आहेत. या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्नीशमन दलाने ही आग सध्या नियंत्रणात आणली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, सहा शिवशाही बसचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या बसच्या बाजूला मोठी इमारत आहे. याशिवाय मॉलदेखील जवळ आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती होती. मात्र, प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

एसटी स्टँड हा प्रचंड वर्दळीचा परिसर आहे. या परिसरात प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी येत असतात. या स्टँड परिसरात सहा शिवशाही बस गेल्या काही दिवसांपासून उभ्याच होत्या. या बसेसला आज दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीचे धुर लांबपर्यंत दिसत होते. ते पाहून अनेक लोक एसटी स्टँड परिसरात दाखल झाले. संपूर्ण शहरात आगीची बातमी पसरली. अनेकांनी आग पाहण्यासाठी गर्दी केली. याशिवाय त्याठिकाणी प्रवाशांचीदेखील गर्दी होती. प्रशासनाने सुरुवातीला प्रवाशी आणि इतर पाहणाऱ्यांना हटकवून तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने तातडीने अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे.

शॉर्टसर्किट की घातपात?

सहा शिवशाही बस या बस स्टँडच्या एका बाजूला उभ्या होत्या. त्यामुळे कुणीतरी मुद्दामून आग लावण्याचं कृत्य केलं की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली याचा तपास पोलीस करत आहेत. या आगीच्या माध्यमातून कुणाचा घातपात घडवण्याचा कट होता की आणखी दुसरं काही कारण होतं? याचा तपास पोलीस करत आहेत.

 

मागे

डॉग स्क्वॉड ओळखणार कोरोना रुग्ण
डॉग स्क्वॉड ओळखणार कोरोना रुग्ण

कोरोनाबाधित व्यक्तींना ओळखण्यासाठी भारतीय लष्करानं (Indian Army ) आपल्या श्वानां....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली
कोरोना | शिवजयंतीसाठी राज्य सरकारची नियमावली

कोरोनामुळे यंदाची शिवजंयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्याबाबत राज्य सरका....

Read more