ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लातूरच्या बसस्थानकात आज्ञाताकडून गोळीबार

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 26, 2019 01:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

लातूरच्या बसस्थानकात आज्ञाताकडून गोळीबार

शहर : लातूर

लातूरच्या बसस्थानकात काल मध्यरात्री गोळीबार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्लॅटफॉर्मच्या शेजारी थांबलेल्या बसमधून एकाने गोळीबार केला. बसमधून गोळीबार केल्याने स्थानक परिसरात खळबळ उडाली. हल्लेखोराने झाडलेली गोळी खिडकीजवळ असलेल्या लोखंडी रॉडवर आदळली आणि हल्लेखोरालाच लागली. यामध्ये तो किरकोळ जखमी झाला. हदगाव ही नांदेडमार्गे जाणारी बस रात्री 11:30 च्या दरम्यान लातूरच्या मध्यवर्ती स्थानकावर दाखल झाली होती. चालक- वाहक हे चहा पाण्यासाठी उतरले असता अचानक बसमधून अज्ञात हल्लेखोर प्रवाशाने गोळीबार केला. खिडकीमधून बाहेर उभ्या असणार्‍या कोणालातरी मारण्याच्या उद्देशाने त्याने हा गोळीबार केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, हल्लेखोर हा लातूरमध्ये बसला होता की कुणावर पाळत ठेवून होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मागे

कोलकतामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला भीषण आग
कोलकतामध्ये इमारतीच्या चौथ्या मजल्याला भीषण आग

दक्षिण कोलकातामध्ये एका एक्साइड रोड जवळ पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्या....

अधिक वाचा

पुढे  

भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर अग्नितांडव
भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर अग्नितांडव

भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रमादित्य या युद्धनौकेवर शुक्रवारी आग लागल्या....

Read more