By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2020 09:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : चंद्रपूर
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी (Sheetal Amte) यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. डॉ. शीतल यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबातील डॉ. दिगंत आमटे (digant amte) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांची आत्महत्या अतिशय धक्कादायक आणि अनपेक्षित आहे,” असं डॉ. दिगंत म्हणाले. डॉ. दिगंत हे प्रकाश आमटे यांचे चिरंजीव आणि डॉ.शीतल आमटे यांचे चुलत भाऊ आहेत.
डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी (30 नोव्हेंबर) आनंदवन येथील त्यांच्या राहत्या घरी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन टोचून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. यावर बोलताना, “हे सगळं काही फारच धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. आम्ही सर्व धक्क्यात आहोत,” असं डॉ. दिगंत आमटे म्हणाले. तसेच, सध्या काही सांगण्याच्या मनस्थितीत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली.
आनंदवनातील राहत्या घरात आत्महत्या
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतलं. त्यानंतर त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यापूर्वीच शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्या करीत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता. हा वाद अनेकदा चव्हाट्यावरही आला.
डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेत्यांनीदेखील त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली आहे. “डॉ. शीतल आमटे-करजगी यांचं अत्यंत धक्कादायक असं निधन झालं. त्यांचा आणि माझा मागील काही महिन्यांत परिचय अधिक चांगल्या प्रकारे झाला होता. 25 नोव्हेंबर 2020 ला माझे आणि त्यांचे बोलणे झाले होते. तेच आमचे शेवटचे बोलणे ठरले. अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी शीतल यांच्या जाण्यावर शोक व्यक्त केला.
राजधानी दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी आंदोलनाला बसले आहे. गेल्या 5 दिवसां....
अधिक वाचा