By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 17, 2020 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे. कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हिंदुजा रुग्णालयातून या रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ६४ वर्षाच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशभरात आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कर्नाटक, दिल्लीनंतर मुंबईत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.
मुंबईत पहिला बळी गेल्याने आता महाराष्ट्रातील जनतेला आता आणखी काळजी घेण्याची गरज आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात हा कोरोनाच्या रुग्णांची वाढ होतान दिसत आहे.
आठवड्याभरात कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. १०८ जण संशयित असून त्यांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे. तर १०६३ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
कोरोनाची लागण झालेल्या ६३ वर्षीय व्यक्तीवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. दुबईहून परतल्यानंतर करोनाची लागण झाली असल्याने त्यांना कस्तुरबा रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून मंत्रालयात सामान्....
अधिक वाचा