By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 06:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेसाठी आर्थिक वर्ष २०१८-२०१९ आतापर्यंतचं सर्वात सुरक्षित वर्ष ठरलं. रेल्वेच्या १६६ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच २०१८-२०१९ मध्ये रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही. भारतीय रेल्वेसाठी हे एक मोठं यश आहे. इतकंच नाही तर भारतीय रेल्वेच्या अपघातांमध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
भारतीय रेल्वेने जारी केलेल्या आकड्यांनुसार, रेल्वे अपघातात धडक मारणे, गाडीत आग लागने, क्रॉसिंगमध्ये गोंधळ सारख्या घटनांमध्ये गेल्या ३८ वर्षांत ९५ टक्के घट झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०१७-२०१८ मध्ये भारतीय रेल्वे नेटवर्कमध्ये एकूण ७३ अपघात झाले होते. रेल्वेद्वारे अंमलात आणल्या जाणाऱ्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षात अशा प्रकारच्या ५९ घटना घडल्या आहेत. प्रति मिलियन किलोमीटरदरन्यान अशा प्रकारच्या घटनांमध्ये ०.०६ टक्क्यांनी घट झाली आहे.
रिपोर्टनुसार, वर्ष १९६०-६१ मध्ये या प्रकारचे २,१३१ अपघात झाले होते. वर्ष १९७०-७१ मध्ये ८४०, वर्ष १९८०-८१ मध्ये १,०१३ वर्ष १९९०-९१ मध्ये ५३२, वर्ष २०११-१२ मध्ये १४१ प्रकरणं समोर आली आहेत. वर्ष १९९० ते १९९५ दरम्यान अशा प्रकारच्या अपघातांमध्ये २,४०० प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर ४,३०० प्रवासी जखमी झाले होते. वर्ष २०१३ ते २०१८ दरम्यान दाखल करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या रेल्वे अपघातांमध्ये ९९० लोकांना आपला जीव गमवावा लागला होता, तर १,५०० प्रवासी जखमी झाले होते.
चंडीगढ - राज्य ग्राहक विवाद निवारण आयोगाने पेप्सिको इंडिया कंप....
अधिक वाचा