By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 01:14 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विरार पूर्वेकडील कोपरी भागातील अनधिकृत इमारतीचा काही भाग कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. नित्यानंद धाम या अनधिकृत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा आणि टेरेसचा काही भाग काल रात्री कोसळला. इमारतीत ८०च्या वर कुटुंब राहतात.
कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली भूमी पाटील नावाची चिमुरडी अडकली होती. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल कर्मचाऱ्यांरी मदतीसाठी धावले मात्र या दुर्घटनेत भूमीचा दुर्दैवी मृत्यू झाला. इमारतीमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. ही इमारत धोकादायक अवस्थेत असताना टेरेसवर पत्र्याची शेड उभारण्यात आली होती. ही शेड स्लॅबसोबत कोसळल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं.
कोपरी भागातील नित्यानंद धाम या अनधिकृत इमारतीचा काही भाग रात्री कोसळला. बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा आणि टेरेसचा काही भाग रात्री ८ वाजताच्या सुमारास कोसळला होता. दुर्घटना घडली तेव्हा अनेक रहिवाशी आणि लहान मुलं इमारतीत अडकली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दल कर्मचाऱ्यांच्या मदतीने या रहिवाशांना आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतू....
अधिक वाचा