By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 30, 2019 02:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
राज्य सरकारने इमारतीमधील फ्लॅट आणि जागेची नोंदणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील सुमारे 1 लाखांपेक्षा अधिक असलेल्या इमारतींचे जवळपास 3 कोटी फ्लॅटधारक मालक होणार आहेत. फ्लॅट सोबत इमारतींचा मालक असल्याचा पुरावाही त्यांना मिळणार आहे. फ्लॅटधारकांचे नाव प्रॉपर्टी कार्डवर लागणार आहे.
यापूर्वी फ्लॅटच्या खरेदीची नोंदणी केवळ रजिस्टर कार्यालयात व्हायची. इमारतीत कितीही लोक राहत असले तरी मूळ जागेच्या सातबारावर बिल्डरचा किंवा मूळ जागा मालकांचा हक्क असायचा. त्यामुळे सोसायटीची स्थापना झाल्यानंतर फ्लॅटधारक कन्व्हेयन्स डिडसाठी बिल्डरच्या मागे लागायचे. कन्वेयन्स नंतर ही जमीन सोसायटीच्या मालकीची व्हायची; पण फ्लॅटधारकांच्या नावे होत नसे. आता नव्या निर्णयानुसार इमारतीच्या जमिनीवर फ्लॅटधारकाचीही मालकी राहील. त्यासाठी फ्लॅटधारकांकडे नेमकं किती क्ष्रेत्रफळ आहे, यावरून जागेच्या मालकीच प्रमाण ठरेल.
सध्या या कायद्याच प्रारूप ठरविण्याचे काम सुरू आहे. त्याची नियमावली बनविल्यानंतर त्या सूचना व हरकतीसाठी ठेवली जाईल आणि नंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
पुण्याहून सोलापूरकडे भरधाव वेगात निघालेल्या शिवशाही एसटी बसच्या चालक....
अधिक वाचा