By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 04:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत करण्यासाठी अनेक संस्था पुढे आले आहेत. तसेच खेळाडू व सिनेकलावंतही सरसावले आहेत. त्याचबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही सांगली कोल्हापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी दौरा करणार आहेत. राज्य सरकारवर सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना, वैयक्तिक पातळीवरचे अनेक गट आणि सर्वसामान्य नागरिकही पूरग्रस्तांना मदत करीत आहेत. अभिनेता रितेश देशमुख, ऊर्मिला मातोडकर, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, रवी जाधव, कुशल बद्रिके, हार्दिक जोशी (राणादा), अभिजित चव्हाण, विजू माने, संतोष जुवेकर आणि मकरंद अनारसपुरे, नाना पाटेकर ,नाम फाउंडेशन,आदी मराठी कलाकार व संस्थांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. त्याचबरोबर मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे, विक्रमवीर सचिन तेंडुलकर यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे तर अभिताभ बच्चन, अक्षय कुमार या बॉलिवूड सेलिब्रिटींनी पूरग्रस्तांसाठी मदत दिली आहे.
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना उद्या साजरा होणाऱ्या स....
अधिक वाचा