ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांना 1 हेकटरवरील नुकसानावर कर्ज माफ - मुख्यमंत्री

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 19, 2019 07:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पूरग्रस्त भागातील शेतकर्‍यांना 1 हेकटरवरील नुकसानावर कर्ज माफ - मुख्यमंत्री

शहर : मुंबई

कोल्हापूर-सांगलीतील पूरग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा देणारी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. पूरग्रस्त भागातील शेतकर्‍याना 1 हेक्टरवरील नुकसानावरचं कर्ज माफ केल जाणार आहे. शिवाय पुरामध्ये ज्यांची घर कोसळली आहेत. त्यांनाही सरकार मदत करणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी संगितले.

यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे संगितले की, 1 हेक्टर पर्यंत शेतकर्‍यांनी जे काही पीक घेतले असेल, त्यासाठी नियमाने जे कर्ज मिळत तेवढं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. उदाहरणार्थ एखाद्या शेतकर्‍याने उस लावला असेल तर त्याला जे जास्तीत जास्त कर्ज मिळत ते माफ केल जाणार आहे. ज्यांनी कर्ज घेतलं नाही आणि पण त्याच्या पिकाच नुकसान झालं आहे, अशा शेतकर्‍यांना सरकारच्या नियमाप्रमाणे जी नुकसान भरपाई दिली जाते त्याच्या तिप्पट भरपाई राज्य सरकारतर्फे दिली जाणार आहे.कोसळलेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. शिवाय ज्यांची घर कोसळली आहेत. ज्यांना 1 लाख रुपये अतिरिक्त मदतही  केली जाणार आहे, पाच ब्रास वाळू आणि मुरूमही दिला जाईल. ज्या छोट्या व्यापार्‍याचे नुकसान झाल आहे. त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत मदत दिली जाईल. त्याचबरोबर रोगराई, महामारी पसरू नये यासाठी तातडीची पावलं उचलली जात आहेत. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मागे

भडवळे गाव डोंगराला पडलेला भेगांमध्ये धोक्यात
भडवळे गाव डोंगराला पडलेला भेगांमध्ये धोक्यात

रत्नागिरी जिल्ह्यातील भडवळे गावात डोंगराला पडलेला 12 ते 15 फूट खोल आणि15 फूट रु....

अधिक वाचा

पुढे  

माजी पंतप्रधान राजीव गांधींना दिग्गजांनी वाहिली आदरांजली
माजी पंतप्रधान राजीव गांधींना दिग्गजांनी वाहिली आदरांजली

माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांची आज ७५ वी जयंती आहे. यानिमित्त माज....

Read more