ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2024 11:39 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

शहर : देश

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच भारताला 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? याची माहिती दिली. त्यासाठी कोणकोणत्या विभागात काम करणार आहे, हे सांगितले. भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पहिल्या 5 मध्ये आली आहे. आता येत्या काळात पहिल्या तीन अर्थव्यवस्थेत भारत येणार आहे. तसेच 2047 मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यात येणार आहे.

सरकार याला देणार प्राधान्य

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशातील भ्रष्टाचार संपवण्याकडे वाटचाल सुरु आहे. गरीब, महिला, शेतकरी यांच्या प्रगतीसाठी योजना तयार केल्या गेल्या आहेत. मागील दहा वर्षांत 25 कोटी नागरिक गरीबी रेषेमधून बाहेर आले आहे.

अर्थमंत्र्यांच्या भाषणात महत्वाचे मुद्दे

  • 78 लाख लोकांना पीएम स्वानिधी योजनेचा लाभ
  • 10 वर्षात 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत.
  • सरकार जीडीपीकडे लक्ष देत असून त्याचा परिणाम दिसून येत आहे.
  • मुद्रा योजनेंतर्गत महिलांना 30 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.
  • पीएम आवास अंतर्गत 70 टक्क्यांहून अधिक घरे महिलांना दिली जात आहेत.
  • सर्वसामान्यांचे सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांहून अधिक वाढले आहे.
  • प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षात ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार आहेत.
  • 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
  • एक कोटी महिला लखपती दीदी बनल्या.

मागे

47 लाख कोटींचा धनकुबेर पण मुलगा भारतीय लष्करात अधिकारी
47 लाख कोटींचा धनकुबेर पण मुलगा भारतीय लष्करात अधिकारी

इब्राहिम यांच्याजवळ 5.7 दक्षलक्ष डॉलर म्हणजे 47.33 लाख कोटी रुपये संपत्ती आहे. इ....

अधिक वाचा

पुढे  

तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी
तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी

लोकसभेची निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्या....

Read more