By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 13, 2020 09:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
“रविवारी आम्ही अमरावतीहून मुंबईला जाऊ. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊन त्यांना विनंती करु. त्यांनी स्वीकारलं तर ठीक, नाहीतर मातोश्रीसमोर आंदोलन करु,” असा इशारा खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारला दिला. नवनीत राणा यांचे पती आमदार रवी राणा मोझरी येथे आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. या पार्श्वभूमीर नवनीत राणा यांनी हा इशारा दिला. त्या अमरावतीत माध्यमांशी बोलत होत्या. “हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. मी अनेकदा राज्य सरकारकडे शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती केली. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली. आता रविवारी आम्ही अमरावतीहून मुंबईला जाऊ. आमच्यासोबत काही शेतकरीही असतील. आम्ही शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसीठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निवेदन देऊ. जर त्यांनी स्वीकारलं तर ठीक, नाहीतर शेतकऱ्यांना घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करु,” असं नवनीत राणा म्हणाल्या. तसेच, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, अतिवृष्टी आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत आल्याने आमदार रवी राणा यांनी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. यावेळी रवी राणा यांच्यासह शेतकऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रवी राणांच्या पत्नी खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मातोश्रीसमोर आंदोलन करणार असल्याचा इशार दिला आहे.
रेल्वे मंत्रालयानं मुंबईतील लोकलमधून प्रवास करण्यासाठी शिक्षक आणि शिक्....
अधिक वाचा