ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसर्‍या दिवशी अघोषित ब्लॉक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 05:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्य आणि हार्बर रेल्वेवर सलग दुसर्‍या दिवशी अघोषित ब्लॉक

शहर : मुंबई

सलग दुसर्‍या दिवशी मध्य आणि हार्बर रेल्वेवर अघोषित ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. कोणतिही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे. सध्या मध्य रेल्वेवर 12.55 ते 1.25 या कालावधीमध्ये ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही दिशेकडे जाणार्‍या वाहतूकीवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची सर्व रेल्वे स्थानकावर गर्दी झाली आहे. सध्या लोकल सेवा उशिराने सुरु आहे. मंगळवारी मध्य आणि हार्बर रेल्वेने मध्येच ब्लॉक घेतला होता. मधल्या दिवशी गर्दीच्या वेळी अशाप्रकारे ब्लॉक घेतला जात नाही मात्र सलग दुसर्‍या दिवशी ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. सध्या गाड्या 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरु आहेत. एक तर उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुंबईकरांना प्रचंड गर्मीचा सामना करावा लागत आहे. अशातच एकाच ठिकाणी लोकल थांबल्यामुळे आणि प्लॅटफॉर्मवर गर्दी झाल्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.

मागे

गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी
गडचिरोलीमध्ये भीषण अपघात 3 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

गडचिरोलीतील आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ आज सकाळी 11  वाज....

अधिक वाचा

पुढे  

प्रेमाच्या तंद्रीत असलेल्या प्रेमी युगुलाला  प्रेयसीच्या घरच्यांनी बसस्थानकातच चोपले, व्हिडियो व्हाय
प्रेमाच्या तंद्रीत असलेल्या प्रेमी युगुलाला प्रेयसीच्या घरच्यांनी बसस्थानकातच चोपले, व्हिडियो व्हाय

स्वतःच्या तंद्रीत असलेल्या प्रेमाच्या भावविश्वात रमत एकमेकांसोबत गप्पा क....

Read more