ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 16, 2019 03:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवादी सोपवा तरच संबंध सुधारतील, भारताचा पाकला इशारा

शहर : देश

पाकिस्तानात लपलेले मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकने भारताला सोपवावे, तरच भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील असा इशारा भारतानं पाकिस्तानला दिला आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी हा इशारा दिला आहे. दाऊद इब्राहिमसारखा अपराधी जोपर्यंत भारताच्या ताब्यात देणार नाही, तोपर्यंत संबंध सुधारणार नसल्याचंही ते म्हणाले. एका परदेशी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जयशंकर यांनी हे वक्तव्य केलं आहे.

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं की, पाकिस्तानने दहशतवादाचा उद्योग विकसित केला आहे. भारतावर हल्ल्यासाठी ते दहशतवादी पाठवतात. मग चर्चा कशी शक्य आहे.काश्मीरबाबत विचारलं असताना, एस जयशंकर यांनी म्हटलं की, 'काश्मीर जगापासून वेगळा झाला असं नाही म्हणता येणार. आम्ही ऑगस्टला घोषणा केली होती. या निर्णयाच्या विरोधात फुटीरतावादी लोकं हिंसा आणि अशांती पसरवण्याचा प्रयत्न करु शकत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून पाऊलं उचलली गेली होती. पण हळूहळू बंदी मागे घेतली गेली आणि आता स्थिती सामान्य आहे. फोनसेवा सुरु झाल्या आहेत. दुकानं उघडली आहेत. व्यापार वाढत आहे.'कोणता देश आपल्या शेजारील राष्ट्रासोबत चर्चा करेल जो देश त्यांच्याविरोधात दहशतवादाचा अभ्यास करतो. असं देखील एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.

 

मागे

एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय
एकाच दिवशी होणार सर्वांचा पगार; सरकार घेणार निर्णय

मोदी सरकार वेग-वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा न....

अधिक वाचा

पुढे  

केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या
केईएम रुग्णालयात 28 वर्षीय डॉक्टराची आत्महत्या

केईएम रुग्णालयात एका डॉक्टराने आत्महत्या केली. या घटनेमुळे रुग्णालयात एकच ....

Read more