ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 08, 2020 08:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सीबीआयच्या माजी संचालकांचा संशयास्पद मृत्यू, आत्महत्येची शक्यता

शहर : देश

मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि सीबीआयचे माजी संचालक अश्वनी कुमार यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे (Former CBI director Ashwani Kumar found dead at Shimla residence). शिमला येथील त्यांच्या घरी ते मृतावस्थेत आढळून आले. शिमलाचे पोलीस अधीक्षक मोहिम शिमला यांनी याबाबत माहिती दिली.

अश्वनी कुमार हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक देखील होते. त्याआधी ऑगस्ट 2008 ते नोव्हेंबर 2010 या काळात ते सीबीआयचे संचालक होते.

अश्वनी कुमार यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह शिमलामधील ब्रोंकोहर्स्ट येथील आपल्या घरात फासावर लटकलेल्या आढळला आहे. शिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला म्हणाले, “मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि माजी सीबीआय संचालक अश्वनी कुमार यांचा मृतदेह शिमला येथील घरात फाशी घेतलेल्या स्थितीत आढळला आहे.”

पोलिसांना घटनास्थळावर एक सुसाईड नोटही मिळाली आहे. यात म्हटलं आहे, “मला माझ्या कुटुंबावर ओझं व्हायचं नाही. जीवनाला कंटाळून पुढील यात्रेसाठी जात आहे.” मागील काही दिवसांपासून अश्वनी कुमार नैराश्यात असल्याचंही सांगितलं जात आहे.

अश्वनी कुमार यांच्याकडून अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास

अश्वनी कुमार हे अत्यंत सुसंस्कृत आणि गंभीर व्यक्ती मानले जात होते. ते कमी बोलायचे, मात्र नेहमी हसतमुख असायचे. CBI संचालक म्हणून काम पाहताना त्यांच्या कार्यकाळात अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले होते.

मागे

हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द
हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार मालक सावधान, अन्यथा कायमचा होईल परवाना रद्द

कोरोनाचा धोका वाढत असला तर राज्य आता अनलॉकच्या प्रक्रियेत आहे, त्यामुळे अन....

अधिक वाचा

पुढे  

मराठा आरक्षणासाठीच्या उद्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला स्थगिती, सुरेश पाटील यांची माहिती
मराठा आरक्षणासाठीच्या उद्या पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला स्थगिती, सुरेश पाटील यांची माहिती

मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. मराठा आरक्षण समितीच्....

Read more