ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

शहर : मुंबई

माजी पोलिस महासंचालक उत्तर प्रदेश राज्यपालांचे सल्लागार म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे 'अरविंद इनामदार' हे बुध्दीवादी व्यक्तीमत्व 'वा' पर्व संपले. आज पहाटे इनामदार यांचे मुंबईतील रिलायन्स हरकिसनदास हॉस्पिटल"मध्ये निधन झाले. 'माझे आई', 'देवा', 'वा', 'राम राम माऊली' इनामदार साहेबांच्या या शब्दांना आता अनेकजण पोरके झाले आहेत.

आपल्याला सर्वांनाच अभिमान वाटेल अशा अरविंदरावांची धडाकेबाज कामे

  • 36 वर्षे पोलीस दलात राहून देशसेवा.
  • 1987 साली मुंबई चे अतिरिक्त पोलीस आयुक्त असताना दाऊद इब्राहिमच्या अड्ड्यावर छापा टाकून 300 कोटीचे सोनं जप्त केले.
  • छोटा शकिल, अरूण गवळी यांसारख्या कुख्यात गुंडांना अटक करून मुंबईतील गँगवॉर संपवले.
  • टाडा, मोक्का यासारखे महत्वाचे कायदे राज्यात लागू केले.
  • गव्हर्नमेंट स्टाफ कमिशनचे चेअरमन.
  • आंध्र प्रदेशात जाऊन नक्षलवादी चळवळीचा खात्मा.
  • उत्तरप्रदेशच्या राज्यपालांचे सल्लागार म्हणून काम.
  • श्रीमंत बाबासाहेब पुरंदरेंच्या 'जाणता राजा' नाटकाचे संकलक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
  • आजपर्यंत सामाजिक कामासाठी कर्तव्यदक्ष प्रामाणिक पोलीस अधिकार्यांचा गौरव यासाठी 'अरविंद इनामदार फाउंडेशन' च्या माध्यमातून ५० लाख रुपयांहून अधिक देणग्या दिल्या.

सर्वात महत्वाचे म्हणजे...

  • राज्यातील पोलीस दलाच्या 'महासंचालक' या सर्वोच्च पदावर असताना भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव पटल्याने जाहीरपणे मत मांडून राजीनामा देणारे भारतातील एकमेव पोलीस अधिकारी.
  • पोलीसातला "माणूस" घडवणारा महासंचालक अरविंदराव इनामदार हे असेच एक आधार होते. ते कायम सत्य बोलले आणि सत्तेपुढे कधी झुकले नाहीत.
  • अरविंद यांची त्यांच्या आडनावाप्रमाणे अत्यंत इमानदार आणि प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अनेक प्रतिकूल प्रसंग घडले, पण कुणापुढे हात पसरला नाही की बदलीसाठी विनंतीही केली नाही.
  • मुंबईत गँगवॉर उफाळून आलं होतं. ते लोक रस्त्यावर येऊन धडाधड गोळीबार करत होते. म्हणजे पोलीस नाही पण रस्त्यावरचे निरपराध लोक मरत होते. त्यावेळेस ते एस..एस.ची स्थापना केली होती. त्यात पहिल्यांदा ३५ ते ४० अधिकारी आणि कॉन्स्टेबल होते. त्यांच्यासाठी त्यानी त्याकाळी बुलेटप्रुफ गाड्या आणि जॅकेट मागवली होती. त्यासाठी सरकारच्या मागे लागले. त्यांनी सरकारला सांगितलं की, जर या गँगस्टर्सचा सामना करायचा असेल तर त्यांच्यापेक्षा चांगली शस्त्र आपल्याकडे पाहिजेत. त्यांच्यापेक्षा आमच्या शिपायांचं मोटिव्हेशन चांगलं पाहिजे. त्यांचे पगार दीडपट केले
  • 1982 साली नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचे प्राचार्य होते त्यावेळेस तिथे सुमारे १५ हजार झाडं लावली. पहिला खड्डा सरांनी खणला.
  • गेली साठ वर्षं ते झगडाताहेत पण एक सिस्टीम तयार करू शकलो नाही, कायदे तयार करू शकलो नाही, एक मानसिकता तयार करू शकलो नाही, कार्यक्षम पोलीस दल तयार करू शकलो नाही, याची अखेर पर्यंत अरविंदराव इनामदार यांना खंत होती

 

मागे

बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज
बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज

भारत संचार निर्गम लि.(बीएसएनएल) ने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी स्वेच्छा न....

अधिक वाचा

पुढे  

अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin
अयोध्या निकाल Live,सुप्रीम कोर्ट,परिसर,कडेकोट पोलीस बंदोबस्त,#AYODHYAVERDICT,#Ayodhya,#AyodhyaHearin

अयोध्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशात कडकोड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात ....

Read more