By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 30, 2019 11:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागारपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्याकडे अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. पडसलगीकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे सहाय्यक म्हणून काम करतील.
दोन विद्यमान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदावरून निवृत्त होत असल्याने पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. अजित डोवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोवाल यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे त्यांना 'जेम्स बॉण्ड' असं म्हटलं जातं. डोवाल यांच्या मदतीसाठी राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली.
पडसलगीकर यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर परदेशातील तपास कामात त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती.
कोण आहेत दत्ता पडसलगीकर?
दत्ता पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
२०१६ मध्ये पडसलगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.
जावेद अहमद यांच्याकडून मुंबईचे ४०वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी सूत्रे स्वीकारली होती.
पडसलगीकरांनी त्यापूर्वी सुमारे १० वर्षे आयबीमध्ये सेवा बजावली
नागपूर, कराड आणि नाशिकमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली
उस्मानाबाद आणि साताऱ्याचे ते अधीक्षक होते.
मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं.
पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान करण्यात आला.
प्रामाणिक आणि सचोटीचे अधिकारी म्हणून पडसलगीकरांची ख्याती आहे.
ऑनलाईन खरेदी करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांपासून लक्षणीय वाढ झाल....
अधिक वाचा