By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 01, 2019 11:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
फक्त आर्थिक धोरणात बदल करून देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही, असं म्हणते देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक लक्षवेधी इशारा दिला आहे. समाजात सध्या पाहायला मिळणारं आर्थिक भयाचं वातावरण बदलून ते विश्वासामध्ये परिवर्तित करुन पुन्हा ८% विकास दर गाठून अर्थव्यवस्था मजबूत करण्याची गरज असल्याची बाब सिंग यांनी ओधेरेखित केली.
अर्थव्यवस्थेविषयीच्या एका संमेलनात भाषण करतेवेळी त्यांनी आपले विचार मांडले. देशाच्या एकंदर अर्थव्यव्यवस्थेविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी पुन्हा एकदा वास्तव सर्वांसमोर आणलं. आपल्या समाजाची स्थितीच अधिक चिंताजनक असल्यामुळे हेच अर्थव्यवस्थेच्या अनिश्चितीकरणाचं प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.
देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये गेल्या वर्षभरात होणारा नुकसानाचा आकडा वाढतच असल्याचं लक्षात येत आहे. कृषी आणि इतरही काही महत्त्वाच्या क्षेत्रांना या साऱ्याचा फटका बसल्यामुळे चालू वर्षातील दुसऱ्या तिमाहीत GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर हा ४.५ टक्क्यांवर राहिला आहे. सहा वर्षांतील हा सर्वात कमी आकडा आहे. साधारण वर्षभरापूर्वी म्हणजेच, २०१८-१९मध्ये याच तिमाहीमध्ये आर्थिक वृद्धीचा दर हा ७ टक्क्यांवर होता. तर, सुरु वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये हे प्रमाण ५ टक्क्यांवर होतं.
गुरुवारी २२,८०० करोड रुपयांच्या नव्या संरक्षण कराराला केंद्र सरकारकडून हि....
अधिक वाचा