ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'उद्या तुमची फी घेऊन जा'....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 09:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'उद्या तुमची फी घेऊन जा'....

शहर : देश

साऱ्या देशाला शोकसागरात टाकणारी एक घटना मंगळवारी घडली. माजी परराष्ट्र मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी  अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झाल्याची माहिती देण्यात आली.

मंगळवारी सायंकाळपर्यंत स्वराज यांची प्रकृती  उत्तम होती. किंबहुना देशातील घडामोडी आणि अनुच्छेद ३७० प्रकरणांवरही त्या लक्ष ठेवून होत्या. जीवनात अखेरच्या क्षणापर्यंत त्या आपल्या कामाशी आणि देशसेवेशी किती प्रामाणिक होत्या याचाच प्रत्यय येत आहे. कारण, माध्यमांमध्ये चर्चा सुरु आहे ती म्हणजे त्यांच्या एका फोन कॉलची. बहुधा तो अखेरचा फोन कॉल असावा असंही म्हटलं जात आहे. जो कायम सर्वांच्या स्मरणात राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचं प्रतिनिधित्व करत पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचा खटला लढणाऱ्या वकील हरीश साळवे यांच्याशी त्यांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच संपर्क साधला होता. जाधव यांचा खटला लढणाऱ्या साळवे यांनी अवघ्या एक रुपयाच्या मानधनावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात हा महत्त्वाचा खटला लढला आहे, त्याची फी  घेऊन जाण्याचं स्वराज यांनी त्यांना सांगितलं होतं.

स्वराज यांच्या निधनाची माहिती मिळताच, साळवे यांनी माध्यमांशी संपर्क साधताना याविषयीची माहिती दिली. 'मंगळवारी रात्री वाजून ५० मिनिटांच्या सुमारास आमचं संभाषण झालं होतं. मी त्यांची भेट घ्यावी, असं त्या म्हणाल्या होत्या. त्या मला कुलभूषण जाधव यांच्या खटल्यासाठीची एक रुपयाची फी देऊ इच्छित होत्या. मी सुद्धा ही अतिशय मौल्यमान अशी फी, मानधन घेण्यासाठी नक्कीच येईन असं त्यांना सांगितलं', असं साळवे म्हणाले. 'उद्या तुमची फी घेऊन जा', असं मोठ्या आपुलकीने सांगणाऱ्या  स्वराज यांच्या निधनामुळे आपण थोरली बहीण गमावल्याची भावना व्यक्त करत त्यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली.

मागे

ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्यावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांच्यावर दुपारी ३ वाजता होणार अंत्यसंस्कार

भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज ....

अधिक वाचा

पुढे  

अख्ख्या जगापुढे कुरापतखोर पाकिस्तानचं 'वस्त्रहरण' करणारी रणरागिणी सुषमा स्वराज
अख्ख्या जगापुढे कुरापतखोर पाकिस्तानचं 'वस्त्रहरण' करणारी रणरागिणी सुषमा स्वराज

संयुक्त राष्ट्र महासभेच्या 73 व्या परिषदेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज य....

Read more