ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत घोळ

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 22, 2020 02:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत घोळ

शहर : पुणे

           पुणे - शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या परीक्षेची प्रश्नपत्रिकाच जर असंख्य चुकांनी भरलेली असेल तर त्याला काय म्हणायचं. टीईटी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत हाच प्रकार मोठ्या प्रमाणात आढळून आला. जेणेकरुन भावी शिक्षकांनाच डोक्यावर हात मारुन घ्यायची वेळ आली. 

 

      शिक्षक पात्रता परीक्षेतला घोळ पाहता तिसऱ्या ऐवजी निसऱ्या, झपाट्याने ऐवजी झपय्याने, ठिकाणी ऐवजी ढिकाणी, बेशुद्ध ऐवजी वेशुद्ध इतक्या सगळ्या चुका पाहून परीक्षेला बसलेल्या भावी शिक्षकांवर बेशुद्ध पडायची वेळ आली असेल.... पेपर २ ची प्रश्नपत्रिका बत्तीस पानांची होती. त्या प्रश्नपत्रिकेतील केवळ तीन पानांमध्येच तब्बल १०५ चुका आढळून आल्या. यातील बहुतांश चुका शुद्धलेखनाच्या आहेत.

 

         महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत टीईटी परीक्षा घेतली जाते. तज्ज्ञांकडून तपासणी झाल्यानंतरच प्रश्नपत्रिका छापली जाते. असं असतानाही इतकी गंभीर चूक कशी झाली याची चौकशी करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकांसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुणदानाबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे. असं असलं तरी यानिमित्ताने परीक्षा परिषदेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.

मागे

बदलापूरात केमिकल कंपनीत स्फोट : एकाचा मृत्यू तर २ जखमी
बदलापूरात केमिकल कंपनीत स्फोट : एकाचा मृत्यू तर २ जखमी

         ठाणे : बदलापूरमध्ये एमआयडीसीत के. जे. रेमेडीज या केमिकल कंपनीत आ....

अधिक वाचा

पुढे  

नागरिकत्व सुधारणा कायद्यास स्थगिती देण्यास नकार 
नागरिकत्व सुधारणा कायद्यास स्थगिती देण्यास नकार 

       नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा तात्काळ रद्द करण्यासंदर्भा....

Read more