By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 10:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विदेशातून येणाऱ्या भारतीय नागरिकांना 14 दिवस म्हणजेच दोन आठवडे घरातच राहण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात येत आहे मात्र, हा सल्ला विदेशातून येणारे भारतीय नागरीक गांभीर्याने घेत नसल्याचं वारंवार उघडकीस येत आहे. नाशिकच्या इगतपुरी येथील चार कोरोना संशियत नागरिक हे ऑस्ट्रेलियातून आले होते. या चारही जणांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले होते मात्र, प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवत हे चारही जण खुलेआम फिरत असल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे हे चारही संशयित रुग्ण कुठल्यातरी पसार झाले होते. अखेर त्यांना शोधण्याच पोलिसांना यश आलं आहे.
नाशिकच्या इगतपुतरी येथील चार जणांचं एक कुटुंब काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला फिरायला गेलं होतं. या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांची दोन मुलं आहेत. या दाम्पत्याचा मोठा मुलगा हा 6 वर्षांचा आहे तर मुलगी अवघ्या एका वर्षाची आहे. हे कुटुंब नुकतंच ऑस्ट्रेलियातून भारतात आलं. त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस होम क्वारंटाईनचे आदेश देण्यात आले.
मात्र, प्रशासनाच्या या आदेशांना गांभीर्याने न घेता हे कुटुंब खुलेआम फिरत असल्याचं निदर्शनास आलं. याबाबत प्रशासनाला कळताच त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक पथक त्यांच्या इगतपुरी येथील घरी गेलं. मात्र, पथक पोहोचण्याअगोदरच या कुटुंबाला त्याबाबत माहिती मिळाली होती. त्यामुळे हे कुटुंब घरातून पसार झालं.
फरार कुटुंबियांना नाशिकात ताब्यात घेतलं
नाशिकमधील आरोग्य पथक त्यांच्या मागावर होतं आणि पोलिसांच्या मदतीने शोध सुरु होता. अखेर नाशिकला त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हे कुटुंब सापडलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या कुटुंबाचं जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तपासणी करुन पुढील निर्णय होणार असल्याची माहिती नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
याअगोदरही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. पालघर रेल्वे स्थानकावर 18 मार्च रोजी चार संशयित रुग्ण आढळले होते. विशेष म्हणजे त्यांच्याही हातावर क्वारंटाईनचे शिक्के होते. हे चारही जण जर्मनीहून मुंबईत आले होते. त्यानंतर गरीबरथ एक्सप्रेसमधून ते चौघे सूरतला जात होते. मात्र त्या दरम्यान आजूबाजूच्या प्रवाशांच्या प्रसंगावधानामुळे या गाडीला पालघर स्थानकावर थांबा देत या संशयित रुग्णांना पालघरला उतरवण्यात आलं होतं.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात य....
अधिक वाचा