ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक

शहर : कोल्हापूर

            कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगावात शॉर्टससर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या शॉर्टससर्किटमुळे चार घरे जळून खाक झाली आहेत. आज सकाळी पाचच्या सुमारास विद्युत प्रवाहच्या दाबामुळे शॉर्टससर्किट झाला. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 


         गोकुळ शिरगावात लागलेल्या आगीत रेखा मनोहर पाटील, भारती रतन पाटील, भीमराव कृष्ण पाटील व भुजंगा हनमा पाटील या चौघांच्या घराला आग लागली आहे. या आगीत सर्व साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजले आहे. 


नुकसान : 


         विद्युत प्रवाहाच्या प्रचंड दाबामुळे शॉर्टससर्किट होऊन लागलेल्या आगीत चारही घरांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घरात असलेले कापड दुकानात ठेवलेल्या साड्या, कपडे, पैसे, दाग-दागिने, धान्य संपूर्ण जळून खाक झाली आहे.


            दरम्यान, ही घरे एकमेकांना चिकटून आणि डबल मजली लाकडाची असल्याने लगेच पेट घेतल्याने चारही घरे उद्धवस्थ झाली. आगीने रौद्र रूप धरण केल्याने या आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तरुण मंडळींनी लगेचच अग्निबंब बोलावले. गोकुळ शिरगावचे माजी सरपंच संदीप पाटील आणि उद्योजक राजू गोरे यांनी या आगीमध्ये चारी घरांचे जवळपास वीस ते बावीस लाखापर्यंतचे नुकसान झाल्याचे सांगितले.
 

मागे

चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 
चंदा कोचर यांची 78 कोटींची मालमत्ता जप्त 

          मुंबई - आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ आणि एमडी चंदा कोचर आणि त्....

अधिक वाचा

पुढे  

युक्रेंनचं विमान चुकून पाडलं; इराणी लष्कराची कबुली
युक्रेंनचं विमान चुकून पाडलं; इराणी लष्कराची कबुली

     तेहरान, इराण - युक्रेनच्या विमानाचा अपघात झाला होता की ते पाडण्यात आ....

Read more