By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सांगली
सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यामधील झरे गावाजवळ असलेल्या विहिरीत जीप कोसळून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्वजण पारेकरवाडीतील रहिवासी असल्याचे समजते पण मृतांमध्ये तीन पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.
नातेवाईकाच्या अंत्यंसंस्कारासाठी हे सर्वजण सातार्यात चालले होते. परंतु, झरे गावाजवळून जात असतांना हा अपघात झाला. यापैकी एक जण गाडीची काच फोडून बाहेर आल्याने त्याचा जीव वाचल्याची माहिती मिळाली आहे.
अपघातामध्ये मच्छिंद्र पाटील, कुंडलीक बरकडे, गुंडा डोंबाळे, संगीता पाटील आणि शोभा पाटील या सर्वांना आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी आटपाडी पोलीस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नेमकी ही घटना कशी घडली असावी? या प्रकरणाची चौकशी आटपाडी पोलीस करीत आहेत.
मुंबई : मुंबईतील वस्त्यांमधील स्वच्छतेसाठी गेली सुमारे १० व....
अधिक वाचा