By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 18, 2020 07:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांसाठी राज्यातील तीन प्रयोगशाळांवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे
रुग्णांचे रिपोर्ट्स यायलाही वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी चार ते पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.
टोपे म्हणाले, “राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या केवळ तीनच प्रयोगशाळांमार्फतच करोना विषाणूग्रस्तांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या प्रयोगशाळांवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईतील केईएम रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणीही करोनाच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. बहुधा पुढील पाच दिवसांत ते आपलं काम सुरु करतील.” त्याचबरोबर राज्यातील विविध भागांमध्येही यासारख्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली.
राज्यात कोरोना व्हायरसचा सर्वत्र उद्रेक झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तुंचा त....
अधिक वाचा