ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चक्क ४ वर्षाच्या ‘सह्याद्री’ने सर केला ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 03, 2020 07:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चक्क ४ वर्षाच्या ‘सह्याद्री’ने सर केला ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका

शहर : पुणे

          पुणे- गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण करण्याचा संदेश घेऊन समुद्र सपाटी पासून ३ हजार फूट उंच लिंगाणा सुळका अवघ्या चार वर्षीय चिमुकलीने सर केला आहे. सह्याद्री महेश भुजबळ अस या चिमुकलीचे नाव असून तिने ही कामगिरी नुकतीच केली आहे. लिंगाणा हा सुळका चढाईसाठी अत्यंत अवघड आहे. तो पाहिल्यावरही अनेकांना धडकी भरते. असा अवघड आणि तितकाच आव्हानात्मक लिंगाणा सुळका सह्याद्री या चार वर्षांच्या मुलीने सर केल्याने तिचं कौतुक होतं आहे.


        सह्याद्री ११ महिन्यांची होती तेव्हापासून तिला गड-किल्ले याबाबद्दल माहिती देत संवर्धन करण्याची शिकवण वडील महेश भुजबळ यांनी दिली. रायगड, सिंहगड, दिवेघाट येथील मल्हारगड, तुंग, प्रतापगड  अशा  १३ गडकिल्ल्यांची भटकंती सह्याद्रीने केली आहे. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला असं तिचे वडील सांगतात.

 

          गड किल्ल्यांचे संवर्धन आणि रक्षण याचा संदेश देण्यासाठी तिने लिंगाणा सुळका सर करण्याचे ठरवले असल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मुळाक्षरे गिरवण्याच्या वयात सह्याद्रीने लिंगाणा सुळका सर करण्याचे स्वप्न पाहिले होते. यासाठी खडतर परिश्रम घेत सागर नलावडे आणि वडील महेश भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाणा सुळका सर करण्याची तयारी तिने केली.  


        नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी सकाळी आठच्या सुमारास रोपच्या साहाय्याने सुळका सर करण्यास सुरुवात केली. ट्रेकिंग करताना सुरक्षेची सगळी साधनं घेऊनच हे पाऊल उचलण्यात आलं होतं.  वडील महेश आणि सागर नलावडे यांनी रोपच्या मदतीने सह्याद्रीला लिंगाणा सुळका चढण्यास मदत केली. 


        सुळक्याच्या मध्यभागी गेल्यानंतर दुपारच्या सुमारास तिने विश्रांती घेतली आणि पुन्हा चढाईला सुरुवात केली. संध्याकाळी चारच्या सुमारास लिंगाणा सुळका सह्याद्रीने सर केला. सुळका सर करताच सह्याद्रीमध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. तिथे जाताच तिने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.


       दरम्यान या चिमुकल्या सह्याद्रीच्या नावाचाही किस्सा आहे.  महेश यांना बहिणीच्या मुलीचं नामकरण सह्याद्री करायचं होतं. परंतु त्यांना दोन्ही मुलंच झाली. त्यामुळे महेश यांचा विवाह झाल्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली तिचं नाव त्यांनी  सह्याद्री ठेवलं.
 

मागे

व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस
व्हॉट्स अॅपवर २४ तासांत १०० अब्ज मॅसेजेसचा पाऊस

         नवी दिल्ली - सण, उत्सव, वाढदिवस, नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्....

अधिक वाचा

पुढे  

इराकच्या हवाई हल्ल्यात ६ जण ठार; युद्ध भडकणार?
इराकच्या हवाई हल्ल्यात ६ जण ठार; युद्ध भडकणार?

       इराकच्या बगदादमध्ये अमेरिकेने आज पुन्हा एक हवाई हल्ला चढविला आह....

Read more