ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनाप्रमुख यांचे मित्र म्हणतात, उद्धव हे कृष्ण, मी त्याचा सुदामा आहे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 28, 2019 12:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनाप्रमुख यांचे मित्र म्हणतात, उद्धव हे कृष्ण, मी त्याचा सुदामा आहे

शहर : मुंबई

कृष्ण आणि सुदामा.. मैत्रीचं हळूवार नातं जपणारी दोन नावं.... सुदामाच्या भाबड्या मैत्रीकरता कृष्ण आपला राजथाट सो़डून अगदी त्याच्या झोपडीतही जायचे अशी ही मैत्री... अशीच काहीशी गोष्ट आहे उद्धव ठाकरे आणि घनश्याम शांताराम बेडेकर यांच्या मैत्रीची...

17 वर्षाच्या कोवळ्या वयातील मैत्रीने तब्बल 40 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. कृष्ण आणि सुदामासारखी उद्धव आणि घनश्याम यांची गोष्ट. 1976 साली जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये उद्धव ठाकरे आणि घनश्याम बेडेकर यांनी आपापल्या कलेत निपुणता मिळवण्याकरता प्रवेश घेतला.

पाणावलेल्या डोळ्यांनी घनश्याम जुन्या आठवणी सांगतात. उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख असून आज महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचं नाव. उद्धव ठाकरे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एवढी मोठी व्यक्ती असूनही घनश्याम आणि उद्धव यांची मैत्री आजही टिकून आहे. उद्धव आणि घनश्याम यांचा संवाद एका मॅसेजवर होतो.

घनश्याम सांगतात की,'माझ्या मुलाला इंजिनिअरिंगकरता प्रवेश मिळत नव्हता. 10 ते 15 लाखांची अतिरिक्त पैशांची मागणी (डोनेशन) केली जात होती. एवढे पैसे भरणं मला शक्य नव्हतं.' यावेळी घनश्याम यांनी उद्धव ठाकरेंना एक मॅसेज केला. ज्यानंतर उद्धव ठाकरेंनी तात्काळ 'घाबरू नको, मी प्रयत्न करतो.' (Don't Worry, I Will Try)असा रिप्लाय केला.

घनश्याम यांनी उद्धव ठाकरेंच हे उत्तर घरातील भिंतीवर लिहून ठेवलं. त्याच दिवशी रात्री 11 वाजता उद्धव ठाकरेंचा घनश्याम यांना फोन आला. मुलांच्या प्रवेश प्रक्रियेची, महाविद्यालयाची सगळी चौकशी केली. त्यानंतर एका मुलाचं इंजिनिअरिंगला आणि दुसऱ्या मुलाचं आर्किटेक्चरला प्रवेश झाला..

भावूक झालेले घनश्याम सांगतात,'उद्धव माझे कृष्ण आणि मी त्यांचा सुदामा... उद्धव माणूस म्हणून खूप चांगले आहेत. अगदी महाविद्यालयीन जीवनापासून त्यांचा हा स्वभाव आहे. लोकांची काळजी घेणं. त्यांना सोबत घेऊन राहणं.'

कॉलेजच्या आठवणींना उजाळा देत घनश्याम सांगतात की,'कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर एक वर्षापर्यंत कुणाला ठाऊक नव्हतं की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे.' 1976 साली 17 वर्षांच्या उद्धव ठाकरेंनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला. उद्धव ठाकरेंच अतिशय साधी राहणीमान होतं. दररोज त्यांच्या चार-पाच मित्रांना घरून डबा आणत असतं. हर्बरच्या लोकल ट्रेनमधून उद्धव प्रवास करून वांद्रे ते सीएसटी असा प्रवास करत.

कॉलेजची आणखी एक आठवण शेअर करताना घनश्याम उद्धव ठाकरेंचा स्वभाव अधोरेखित करतात. कॉलेजमध्ये प्राध्यापकांनी आंदोलन पुकारलं. यावेळी कॉलेजमधील सगळ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार बाळासाहेब ठाकरेंना बोलवण्यास सांगितलं. हे आंदोलन जवळपास दोन ते तीन महिने चाललं. मात्र उद्धव यांनी बाळासाहेबांना सांगितल नाही. कुठूनतरी हा सगळा प्रकार बाळासाहेबांना कळला आणि त्यांनी कॉलेजमध्ये येऊन प्राध्यापकांना समजावलं. ज्यानंतर अगदी दुसऱ्या दिवशी कॉलेज सुरू झालं. पण याचा राग म्हणून उद्धव ठाकरेंना त्यावर्षी नापास करण्यात आलं. पण महत्वाची गोष्ट म्हणजे घनश्याम पुढे सांगतात की, 'मात्र शेवटच्या वर्षी उद्धव ठाकरेच महाराष्ट्रातून पहिले आले.'

घनश्याम आणि उद्धव ठाकरे यांची मैत्री आजही तशीच आहे. याचं उदाहरण देताना घनश्याम सांगतात की,'उद्धव मला आजही भेटले तरी ते मराठी गाणं घनश्याम सुंदरा श्रीधरा... असं गाऊनच हाक मारतात.' 1988 साली 'सामना' वृत्तपत्राची सुरूवात झाली. तेव्हा उद्धव ठाकरेंनी घनश्याम यांनी सामनामध्ये रूजू होण्यास सांगितलं. मात्र आपल्या पूर्व जबाबदाऱ्यांमुळे त्यांना ते शक्य झालं नाही. मात्र आजही घनश्याम यांच्या मनात ती सल आहे.

मागे

'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे
'सामना'ची जबाबदारी संजय राऊतांकडे

आजचा 'सामना' विशेष आहे. उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत त्....

अधिक वाचा

पुढे  

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन

भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष, तसेच भाजपा आमदार स्मिता वाघ यांचे पती उदय वाघ या....

Read more