ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2020 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दुधाच्या पिशवीतूनही घरात शिरु शकतो कोरोना; 'या' गोष्टींची घ्या काळजी

शहर : मुंबई

Coronavirus कोरोना व्हायरसचा सर्वत्र प्रादुर्भाव वाढत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी या विषाणूशी लढण्यासाठी म्हणून आणि त्याच्यापासून दूर राहण्यासाठी म्हणून काही पावलं उचलली जात आहेत. यामध्ये मग प्रतिबंधात्मक उपाय असो किंवा रोजच्या सवयींमध्ये केलेले बदल. याच परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता 'फूड सेफ्टी एँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया' अर्थात एफएसएसआय FSSI कडून महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्व आहेत प्लास्टीकच्या सीलबंद पिशवीतून येणाऱ्या दुधासंबंधीची.

तुम्ही आणि घरी दुध पोहोचवायला येणारी व्यक्ती मास्क वापरत आहे ना याची काळजी घेतली जाणं अनिवार्य आहे. याव्तिरिक्त घ्यायची काळजी खालीलप्रमाणे...

- बाजारातून दुधाची पिशवी घरी आणल्यानंतर ती लगेचच वापरु नका.

- वाहत्या नळाखाली ही पिशवी चांगल्या पद्धतीनं धुवून घ्या.

- गरज भासल्यास ही पिशवी साबणानं धुवा.

- दुधाची पिशवी वाहत्या पाण्याखाली धुतल्यानंतर स्वत:चे हातही साबणाने स्वच्छ धुवा.

- कात्रीच्या सहाय्यानं ही दुधाची पिशवी कापून त्यातील दूध भांड्यात काढून घ्या.

- दूध पातेल्यात किंवा भांड्यात ओततेवेळी त्यातून पिशवी धुतल्यानंतर त्यावरील पाणी ओघळणार नाही याची काळजी घ्या.

- पाणी दुधात जाण्यापासून टाळण्यासाठी पिशवी धुतल्यानंतर ती पातेल्यात ओतण्याआधी नीट पुसून घ्या.

- पिशवीतील दूध नीट तापवून त्यानंतरच वापरात आणावं.

मागे

तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल
तर डॉक्टरांचा परवाना रद्द करण्यात येईल

राज्यात अनेक ठिकाणी अवाजवी शुल्क आकारून कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार हो....

अधिक वाचा

पुढे  

बीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित
बीएमसी आयुक्तांच्या सुरक्षेसाठी बाऊन्सर्स, खाजगी सुरक्षारक्षक नेमल्याने महापौरही चकित

मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर स....

Read more